ओबीसी संघटनांचं बँडबाजा आंदोलन, Band Movement of OBC organization

ओबीसी संघटनांचं बँडबाजा आंदोलन

ओबीसी संघटनांचं बँडबाजा आंदोलन
www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ

यवतमाळात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या घरासमोर विविध ओबीसी संघटनांतर्फे बँडबाजा आंदोलन करण्यात आलं. यावेळी राणा प्रताप नगर येथील मोघे यांच्या बंगल्यासमोर बॅन्ड वाजवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ओबीसींना घटनात्मक हक्क प्रदान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० अन्वये अनुसूचित जाती, जमातीप्रमाणेच ओबीसी प्रवर्गातील जातींनाही आरक्षण, शैक्षणिक सोयी, नोकरी, बढती आदी सवलतींसाठी घटनात्मक दर्जा प्राप्त आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्राचे सरकार ओबीसींना घटनात्मक हक्क प्रदान करण्याऐवजी झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.

ओबीसींना त्यांचे घटनात्मक हक्क प्रदान करण्याचे कर्तव्य शासन विसरले असून आता ओबीसींच्या उच्च शिक्षणाच्या अधिकारावरच गदा आणायला निघाल्याचा आरोप यावेळी समता परिषदेने केला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, November 2, 2013, 21:42


comments powered by Disqus