आंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!Be Carefull when puchase mango, cancer can be!

आंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!

आंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.

आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण हे आम्ही नाही अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलंय. आंबा कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी कॅलशियम कार्बोनेटचा वापर केला जातोय. अशा आंब्यामुळं कॅन्सर होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील दुकानांमधून तब्बल २४०० किलो आंबे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यां नी जप्त करुन नष्ट केले आहेत.

आंबे पिकवण्यासाठी आंब्याच्या पेट्यांमध्ये कॅलशियम कार्बोनेटच्या पिशव्या टाकण्यात आल्याचं या कारवाईत पुढं आलंय. असे आंबे जर जास्त प्रमाणात खाण्यात आलेत तर ब्लड कॅन्सर, आतड्याचे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

लहान मुले आणि वृद्धांना अशा आंब्यापासून जास्त धोका असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. आंबे घेतांना ते अशा पद्धतीनं पिकवली नसल्याचं नागरिकांनी खात्री करून घ्यावी आणि तरच आंबे विकत घ्यावेत असं आवाहनही डॉक्टरांनी केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 11:30


comments powered by Disqus