Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:11
www.24taas.com, नागपूरलोकांच्या जल्लोषावर विरजण टाकण्याची सवय काही जणांना असते... प्रजासातक दिनी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना, नागपुरात काही अतिउत्साही युवकांनी इतरांना त्रास देण्यातच धन्यता मानली...
बाइकवर स्टंटबाजी करत वातावरण बिघडवण्याचं काम या युवकांनी केलं.. शहरातल्या फुटाळा तलावाजवळ या बाइकर्सनी जोरदार स्टंटबाजी केली.. आपल्या या कारनाम्यामुळे रस्त्यावरून जाणा-या येणा-यांना त्रास होतोय, याचं जराही भान या युवकांना नव्हतं.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकाराबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येतेय... ट्राफिक पोलीस याची दखल कधी घेणार, असा सवाल नागपूरकर विचारत आहेत...
First Published: Sunday, January 27, 2013, 00:58