Last Updated: Wednesday, January 2, 2013, 21:07
www.24taas.com, नागपूरविदर्भात भाजप टिकवायचा असेल तर युती तोडा असा थेट हल्ला भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार शोभाताई फडणवीस यांनी शिवसेनेवर चढवलाय.
शिवसेना वेगळ्या विदर्भाला विरोध करते मात्र विदर्भावर अन्याय होत असताना गप्प का राहते असा सवाल फडणवीस यांनी केलाय. चंद्रपूर जिल्ह्यात सीमावर्ती भागात प्राणहिता धरणाचे काम वेगाने सुरू आहे. विदर्भाच्या वाट्य़ाचं पाणी पळवण्याचा आंध्रचा प्रयत्न सुरू असताना शिवसेना मात्र या मुद्दावर गप्प का आहे, असा सवाल त्यांनी केलाय.
तर शोभाताई ज्येष्ठ नेत्या, मात्र युती तोडण्याएवढ्या मोठ्या नाहीत, असं सणसणीत प्रत्युत्तर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिलंय.
First Published: Wednesday, January 2, 2013, 21:07