Last Updated: Sunday, October 13, 2013, 13:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याकरीता नागपूरच्या दीक्षाभूमीला भाविकांनी येण्यास सुरवात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
तो दिवस दसऱ्याचा होता आणि तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो. दरवर्षी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी नागपूर मध्ये दाखल होतात. ५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचा मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अन्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली जाते. या सोहळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 13, 2013, 13:36