नागपूरमध्येही धावणार मेट्रो, Cabinet has cleared metro for Nagpur: Prithviraj Chavan

नागपूरमध्येही धावणार मेट्रो

नागपूरमध्येही धावणार मेट्रो

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही मेट्रो रेल्वे धावणार आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यता आला.

शहराच्या पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण भागांना जोडणा-या या प्रकल्पाकरता दोन मार्ग निर्धारित केले असून केंद्र आणि राज्य सरकार कडून या करता निधी मिळणार आहे. शहरातल्या 40 किलोमीटर मार्गावर धावणा-या या मेट्रोच्या मार्गावर 37 स्टेशन असतील.

त्यासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकरता येणा-या एकूण खर्चापैकी ४३.७३ % रकमेचं कर्ज जपानच्या एका आर्थिक कंपनीकडून घेण्यात येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 29, 2014, 18:27


comments powered by Disqus