नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या, Chandrapur Couple Suicide For Intercaste Marriage

नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या

नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या
www.24taas.com,झी मीडीया, चंद्रपूर

चंद्रपुरातील जयहिंद चौक भागात एका नवविवाहित दाम्पत्याने विष पिउन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. सकाळी त्यांच्या घरमालकांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ज्यानंतर आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळून आले.

या दोघांनी तीनच महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता आणि त्यानंतर त्यांनी जयहिंद चौक भागात किरायाचे घर घेवून आपला संसार थाटला. मात्र या आंतरजातीय विवाहाला त्यांच्या कुटुंबाचा विरोध असल्याची माहिती त्यांच्या जवळ आढळलेल्या सुसाईड नोट मध्ये मिळाली आहे, मात्र या नोट मध्ये त्यांनी कुणालाही आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलेले नाही ज्यामुळे या आत्महत्येच्या कारणांचा गुंता वाढला आहे.

पाहा व्हिडिओ


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 11:38


comments powered by Disqus