Last Updated: Saturday, December 21, 2013, 08:54
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूरचंद्रपूर शहरातल्या जुनोना जंगल परिसरात रात्री उशीरा बिबट्यानं सरीता कौरासे या ६ वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची घटना घडलीय.
आपल्या भावासह ही मुलगी झोपलेली असताना बिबट्यानं तिला दूर जंगलात नेलं. वनविभागाच्या शोध मोहिमेत या मुलीचा थेट मृतदेहच सापडला. या भागात १२ दिवसातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.
२ बळी गेल्यावर वनविभागाला जाग आली असून आता वरिष्ठ पातळीवर या भागात पिंजरे लावून समस्याग्रस्त बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, December 21, 2013, 08:54