छगन भुजबळ पक्ष स्थापन करणार का?,Chhagan Bhujbal angry

छगन भुजबळ पक्ष स्थापन करणार का?

छगन भुजबळ  पक्ष स्थापन करणार का?
www.24taas.com, चंद्रपूर

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांच्याबाबत चर्चा आहे. भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, नवा पक्ष स्थापन करण्याची आपली इच्छा नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चंद्रपुरात बोलताना त्यांनी हे विधान केलंय.

दरम्यान, पक्ष स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट करताना भाजप नेते गोपीनाथ मुंडेंसोबत ओबीसी आरक्षणासाठी काम करत राहणार असल्याचं ते म्हणालेत. उद्योजकांनाही पुढे जाण्यासाठी सवलती लागतात, मग ओबीसींना त्या का नकोत, असा सवालही भुजबळ यांनी केलाय.

या विधानामुळे भुजबळ राष्ट्रवादीमध्ये नाराज तर नाहीयेत ना, अशी शंका पुन्हा उपस्थित होतेय. ओबीसी असल्यामुळे पक्षात आपल्यावर अन्याय होत असल्याचं त्यांनी यापूर्वी अनेकदा म्हटलंय. त्याबाबात स्पष्ट नाराजीही व्यक्त केली होती. मला टार्गेट करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखविले होते.

First Published: Monday, February 11, 2013, 08:43


comments powered by Disqus