Last Updated: Saturday, June 22, 2013, 22:41
www. 24taas.com, झी मीडिया,गडचिरोलीसरकारी रुग्णवाहिकेतून नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीमध्ये उघडकीस आलाय. तसंच यामागे एका बड्या काँग्रेस नेत्याचा हात असल्याचंही आरोपींच्या जबाबातून स्पष्ट झालंय.
काँग्रेसच्या नेत्याने नक्षलिंना शस्त्रास्त्र पुरविल्याचे पुढे आले. गडचिरोली लगत पोर्ला गावातल्या सरकारी रूग्णालयाची ही रुग्णवाहिका होती. भामरागड परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही शस्त्रास्त्र हस्तगत केलीत. यात १० डिटोनेटर , AK 47 बंदुकीचे १० राउंड्स, १ किलो जिलेटीन काही जीवनावश्यक औषधी , पावसाळ्यात कामात येणारी ताडपत्री आदी साहित्य सापडलंय.
याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. छन्नुलाल शेंडे, जीवनलाल बोपचे, चालक संजीव चंद्रदास आणि मल्लेलवार यांचा चालक विवेक धाईत अशी त्यांची नावं आहेत.
आरोपींनी काँग्रेसचे बडे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार यांच्या सांगण्यावरून ही शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता मल्लेलवार तसंच पोर्लाच्या आरोग्य केंद्राचे डॉक्टर रवींद्र करपे पोलिसांच्या रडारवर आलेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, June 22, 2013, 22:41