चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा सावळा गोंधळ, स्थायी समिती सभापतींची नोटीस, Congress mayor Cold War in Chandrapur

काँग्रेसचा सावळा गोंधळ, स्थायी समिती सभापतींची नोटीस

काँग्रेसचा सावळा गोंधळ, स्थायी समिती सभापतींची नोटीस
www.24taas.com , झी मीडिया, चंद्रपूर

चंद्रपूर मनपामध्ये सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे. चंद्रपूर मनपात सध्या काँग्रेसच्या महापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यात चांगलचं शितयुध्द सुरू आहे. याबाबत नोटीसच स्थायी समिती सभापतींनी काढलेय.

महापौरांचे पती मनपात मनमानी करतात, अधिका-यांना दम देतात, अनावश्यक हस्तक्षेप करतात, अधिकार नसताना फायली पाहतात अशा तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीं विषयी पाणी डोक्यावरून वाहू लागले तेव्हा स्थायी समिती सभापतींनी मनपा कार्यालयात जागोजागी नोटीसा लावल्यात. यात महिला नगरसेविकांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांनी कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करू नये, अशी तंबी देण्यात आली आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ही नोटीस योग्यच असल्याची भूमिका घेत महापौरांना अडचणीत आणले आहे. ही नोटीस आपल्या पतीच्या विरोधात असल्याचे मत महापौर यांनी करून घेतले आहे. याबाबत महापौर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, ते शहराचे नागरिक आहेत. ते येऊ शकतात. महापौर यांनी लुडबूड करत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013, 09:56


comments powered by Disqus