काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन Congress MLA Nilesh Parvekar dies in Car accident

काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन

काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन
www.24taas.com, यवतमाळ

यवतमाळचे काँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांचे निधन झालंय. त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यवतमाळ इथल्या खाजगी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

अपघातात त्यांच्यासह आणखी दोघेजण जखमी झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवारांनी त्यांची हॉस्पीटलमध्ये भेट घेतली. एका कार्यक्रमासाठी मोरगव्हाण या गावी गेले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. आमदार स्वत: गाडी चालवत होते.

First Published: Sunday, January 27, 2013, 23:53


comments powered by Disqus