Last Updated: Wednesday, October 2, 2013, 15:51
www.24taas.com , झी मीडिया, नागपूर मुख्यमंत्र्यांचं नागपूर आणि विदर्भाकडे लक्ष नाही असा आरोप काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलाय.
राज्यातलं आघाडी सरकार मुंबई पुण्याच्या विकासाकडे जास्त लक्ष देतं असा आरोप करत मुत्तेमवार यांनी राज्यसरकारला घरचा आहेर दिलाय. विदर्भाचे खासदार मेहनत करून केंद्रीय मंत्र्यांना विदर्भ दौऱ्यावर आणतात, पण राज्यातले मंत्री इथे फिरकतही नाहीत असा आरोप मुत्तेमवार यांनी केलाय.
नागपूरमध्ये काल ताजबाग परिसराच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्याच कार्यक्रमात मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्र्यांना हा घरचा आहेर दिलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 2, 2013, 15:47