लाच घेऊन जेलर करतो कैद्यांना फरार व्हायला मदत Corrupt Jailer helps prisoners

लाच घेऊन जेलर करतो कैद्यांना फरार व्हायला मदत

लाच घेऊन जेलर करतो कैद्यांना फरार व्हायला मदत
www.24taas.com, नागपूर

तुरुंगात असलेल्या कैद्यांना पॅरोलवर बाहेर असताना फरार राहण्यासाठी, जेलरच लाच घेत असल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आलाय.

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेला पाटील नावाचा जेलर, प्रत्येक कैद्याकडून दरमहा दोन हजारांची लाच घेतो, आणि त्या बदल्यात कैद्यांना पॅरोलच्या रजेवर असतानाच फरार होण्याची सूट देतो, असा आरोप एका कैद्यानं केलाय.

सध्या या जेलरची नागपूरहून प्रमोशन मिळून मराठवाड्यात बदली झालीय आणि सध्या तो औरंगाबादमध्ये असल्याची माहिती या आरोपीनं दिली आहे.

First Published: Wednesday, January 23, 2013, 23:06


comments powered by Disqus