Last Updated: Thursday, February 21, 2013, 18:24
www.24taas.com, अमरावतीअमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी कॅफो रत्नराज यांना पाच हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं आज ही कारवाई केली.
कंत्राटदार पंकज उबाळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. उबाळे यांची थकीत बिल संमत व्हावे यासाठी रत्नराज यांनी 25 हजारांची लाच मागितली होती. यामधील 20 हजार रुपये त्यांनी आगोदरच स्वीकारले होते. तर उर्वरित पाच हजार रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली.
रत्नराज यांनी यापूर्वी कोणाकडून लाच घेतली होती का ? याचा तपास सुरु असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.
First Published: Thursday, February 21, 2013, 18:24