अपहरण, रेप आणि खून करणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा! culprits of Kidnapping, rape and murder sentenced to death

अपहरण, रेप आणि खून करणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा!

अपहरण, रेप आणि खून करणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

एका १९ वर्षाच्या युवतीचे अपहरण, रेप आणि खून करण्याच्या आरोपाखाली २ आरोपींना नागपूरच्या सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावली. अमर सिंह ठाकूर आणि राकेश कांबळे ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील लोणार गावात ही घटना घडली होती.

१८ डिसेंबर २००५ ला या दोघा आरोपींनी मध्य रात्री असहाय कांचनला तिच्या घरातून सर्व गावकऱ्यांच्या समक्ष उचलून शेतात नेले होते. अतिशय निघृणपणे तिच्यावर अत्याचार करत नंतर तिच्यावर चाकूने हल्ला करीत खून देखील केला होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली होती, पण घटने नंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमर ठाकूर अनेक दिवस फरार होता. ठाकूरवर याच्या आधी देखील खुनाचा आरोप होता आणि २०१० मध्ये अटक झाल्यावर त्याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला होता. खटल्याच्या प्रदीर्घ सुनावणी आणि १९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्यानंतर आज सत्र न्यायालयाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली.

नागपूर जिल्हा न्यायलयाने या वर्षी सुनावलेली ही दुसरी फाशीची शिक्षा आहे. एकाच खटल्यातील २ आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याची घटना देखील क्वचित होत असल्याने आजच्या या आदेशाला महत्व प्राप्त झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, June 28, 2013, 19:08


comments powered by Disqus