बेपत्ता अल्पवयीन मुलींचे सापडले मृतदेह dead bodies of missing girls

बेपत्ता अल्पवयीन मुलींचे सापडले मृतदेह

बेपत्ता अल्पवयीन मुलींचे सापडले मृतदेह
www.24taas.com, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातल्या मुरमाडी गावातल्या बेपत्ता अल्पवयीन मुलींचे मृतदेह गावातील एका विहीरीत आढळल्याने गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या तीनही मुली एकाच घरातील असून त्या 3 दिवसांपासून बेपत्ता होत्या.

या मुलींच्या शाळेजवळ मागील काही दिवसांपासून २० ते २५ वयोगटातील परप्रांतीय तरुण राहत होते. ज्या दिवशी खोली सोडून गेले त्याच दिवशी या तिघ्या बहिणी बेपत्ता झाल्यानं गावक-यांनी या तरूणांवर संशय व्यक्त केलाय. हे तीनही मृतदेह शवविश्चेदनासाठी नेण्यात आले असून पोलीसांनी याबाब मौन बाळगलंय.

दरम्यान गावक-यांनी झालेल्या घटनेचा रोष वेक्त करीत लाखनी तालुका बंद पडला व राष्ट्रीय महामार्ग ६ हा तब्बल २ तास रोखून धरला...

First Published: Sunday, February 17, 2013, 23:18


comments powered by Disqus