भारताच्या डॉ. आशिषनं मोडला पाकच्या डॉक्टरचा विक्रम!, Dhule doc enters Guinness for removing `heavies

भारताच्या डॉ. आशिषनं मोडला पाकच्या डॉक्टरचा विक्रम!

भारताच्या डॉ. आशिषनं मोडला पाकच्या डॉक्टरचा विक्रम!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वैद्यकीय क्षेत्रात एका मराठी डॉक्टरने गिनीज बुकात एकदा नव्हे तर दोनदा नाव नोंदविण्याचा पराक्रम केलाय. धुळ्याचे डॉक्टर आशिष पाटील यांनी केलेल्या किडनीच्या शस्त्रक्रियेची नोंद नुकतीच `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस`मध्ये झालीय.

धुळे शहरातलं `इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी` हॉस्पीटल जागतिक नकाशावर झळकलंय. त्याला कारण आहेत या संस्थेचे मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. आशिष पाटील... डॉ. पाटील यांनी ४२ वर्षीय महिला रूग्णाच्या शरिरातून सर्वांत मोठी किडनी यशस्वीपणे बाहेर काढली. रुग्णाची डावी किडनी निकामी झाली होती. शस्त्रक्रिया करून ३३.७२ बाय १४.१४ बाय १५.०५ सेंटी मीटर आकाराची आणि २.१४ किलो वजनाची ही किडनी यशस्वीपणे काढण्यात डॉ. पाटील यांना यश आलं. याआधी हा विक्रम एका पाकिस्तानी डॉक्टरच्या नावावर होता.

याआधी डॉ. पाटील यांनी एका रूग्णाच्या किडनीतून तब्बल एक लाख ७२ हजार खडे काढण्याचा विक्रम केला होता. अशा प्रकारे दोन वेळा गिनीज बुकमध्ये नाव नोंदवणारे डॉ. आशिष पाटील हे एकमेव डॉक्टर आणि युरॉलॉजिस्ट आहेत.

याशिवाय खानदेशात पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. पाटील यांनी यशस्वी केली. विशेष म्हणजे आपल्या या विश्वविक्रमांचं सर्व श्रेय ते आपल्या रूग्णांना देतात. यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 2, 2014, 13:06


comments powered by Disqus