तळीराम डीनची शिस्तीची शाळा..., Din drunk and came in college

तळीराम डीनची शिस्तीची शाळा...

तळीराम डीनची शिस्तीची शाळा...
www.24taas.com, अकोला

शासकीय महाविद्यालयाचे डीनने चक्क दारू पिऊन टाईट अवस्थेत कॉलेजमध्ये शिस्तीचे धडे इतरांना देत होते. ज्यांना चालण्या बोलण्याची शुद्ध नाही पण त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना शिस्त मात्र शिकवायची.

अकोल्याच्या शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सुधाकर बोभाटे, वेळेत न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करायच्या विचारात आहेत. म्हणून त्यांनी कार्यालयाच्या मेन गेटला लॉक केलं. पण त्यामुळं वेळेत आलेले कर्मचारी बाहेर अडकले. हे डीन महाशय चर्चेत आहेत त्यांच्या `एकच प्याला` च्या सवयीमुळं. आज मात्र कहरच झाला...

चक्क सकाळीच बोभाटे महाशय टाईट होऊन कार्यालयात आले. चालण्या बोलण्याचीही शुद्ध नसलेल्या या महाशयांना कर्मचाऱ्यांना मात्र शिस्त शिकवायची. डीन महाशयांनी याआधीही यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनाला अशाच न सावरणाऱ्या अवस्थेत ध्वजारोहण केले होते.

First Published: Thursday, January 24, 2013, 16:57


comments powered by Disqus