गिझरचा शॉक लागून चिमुरड्याचा मृत्यू , gizzar shock one dead in nagpur

गिझरचा शॉक लागून चिमुरड्याचा मृत्यू

गिझरचा शॉक लागून चिमुरड्याचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया,नागपूर
नागपूरमध्ये इलेक्ट्रिक गिझरच्या धक्क्यानं एका १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कार्तिक पाठक असं या मुलाचं नाव आहे.

नागपूरच्या महाल भागात राहणा-या पाठक यांचा मुलगा कार्तिक रोजच्याप्रमाणं शाळेत जाण्याची तयारी करण्यासाठी आंघोळीला बाथरुममध्ये गेला होता. मात्र बराच वेळ झाल्यावरही तो बाहेर आला नाही म्हणून त्याच्या आईने बाथरूम मध्ये डोकावून बघितले. पण आतले दृश्य बघून त्याच्या आईला धक्काच बसला.

कारण पाणी गरम करण्याकरता बाथरूम मध्ये लावलेल्या इलेक्ट्रिक गिझरच्या धक्याने कार्तिकचा मृत्यू झाला होता. त्यामुळं विजेवर चालणा-या उपकरणांचा वापर करताना प्रत्येक व्यक्तीनं सतर्क राहणं गरजेचे आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 10, 2013, 22:21


comments powered by Disqus