Last Updated: Wednesday, December 11, 2013, 19:02
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर राज्यातल्या जनतेसाठी एक खूषखबर आहे. राज्यात वीजेचे दर कमी करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय.
वीज दराबाबत शासनानं राणे समिती नेमलीय. या समितीचा अहवाल आल्यानंतर वीज दर निश्चित कमी करू, असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. याच महिन्यामध्ये राणे समितीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. कृषी पंपांना वीज मीटर बसवण्याची सरकारची भूमिका असल्याची माहितीही अजित पवारांनी यावेळी दिली. मीटर बसवल्यामुळे बिलाचा गोंधळ होणार नाही असं यावेळी अजित पवारांनी सांगितलंय.
अजित पवारांनी दिलेल्या या आश्वासनामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 11, 2013, 19:02