तान्ह्या मुलीला जमिनीवर आदळून पित्याने केले ठार, father killed his 2 and half year girl

तान्ह्या मुलीला जमिनीवर आदळून पित्याने केले ठार

तान्ह्या मुलीला जमिनीवर आदळून पित्याने केले ठार
www.24taas.com, झी मीडिया, भंडारा

मुलगी का जन्माला आली` या कारणावरून राक्षशी प्रवृत्तीच्या पित्याने आपल्या अडीच वर्षीय मुलीला जमिनीवर आदळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पिता रामभाऊ राहांगडाले याला पोलिसांनी अटक केली आहे.

मृत चिमुकलीचे नाव आर्वी असे आहे. ही घटना भंडारा झिल्यातील तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथे घडली. आरोपी रामभाऊ राहांगडाले याला पहिल्या पत्नीपासून वंश नावाचा चार वर्षीय मुलगा आहे. दारूच्या आहारी गेलेल्या रामभाऊने पहिल्या पत्नीवर अत्याचार केल्याने तिने सोडचिठ्ठी दिली. यानंतर रामभाऊने तामेश्वकरी नामक तरूणीसोबत ३ जून २०१२ रोजी लग्न केले. त्याच्या सुखी संसारात आर्वी नामक मुलीने जन्म घेतला.

आधीच दारूच्या आहारी गेलेल्या रामभाऊचे दुसरी पत्नी तामेश्वसरीवर पहिल्या पत्नीसारखे अत्याचार करणे सुरू होते. `तु मुलीला जन्म का दिला?` या कारणावरून तिला बेदम मारहाण करण्याचा प्रकार सुरू होता.

याच कारणावरून रामभाऊने पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. पाळण्यात अडीच वर्षीय मुलगी आर्वी झोपली होती. नित्याचे भांडण असल्याने रामभाऊ पोटच्या मुलीला संपवणार, अशी कल्पनाही तामेश्वयरीला नव्हती. परंतु डोक्यात सैतानी वृत्ती संचारलेल्या रामभाऊने पाळण्यात गाढ झोपेत असलेल्या आर्वीला हातात घेतले. `तूच या भांडणाला कारणीभूत आहेस` असे म्हणत तिला अंगणात आणून जमिनीवर आदळले. यात आर्वीचा जागीच मृत्यू झाला.

तामेश्ववरीने आर्वीला तत्काळ तुमसरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकार्यांभनी तिला मृत घोषीत केले. या कृत्यानंतरही आरोपी पिता रामभाऊला कोणताही पश्चादताप नाही. तो दारूच्या नशेत होता.त्याचा पत्नीचा तक्रारीवरुन रामभाऊविरुद्ध भादंवि ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 19, 2013, 21:34


comments powered by Disqus