Last Updated: Monday, October 15, 2012, 13:40
www.24taas.com, नागपूरनागपूरच्या गोंडखैरी येथे देशोन्नती वर्तमानपत्राच्या छापखाना परिसरात काल संध्याकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी वर्तमानपत्राचे मालक आणि संपादक प्रकाश पोहोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्या सोबतच्या अन्य 6 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकाश पोहरे यांचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक अकोल्याला रवाना झालं असून पोहरेंना अटक होण्याची शक्यता आहे.
काल झालेल्या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता. देशोन्नती वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांना छापखाना परिसरात नवीन सुरक्षा रक्षक तैनात करायचे होते. त्या प्रमाणे त्यांनी नागपूरहून आपल्या सोबत राजेंद्र दुपारे नावाच्या ५० वर्षांच्या सुरक्षा रक्षकाला सोबत नेले होते. पण नवीन सुरक्षा रक्षकाला बघून जुन्या आणि नवीन रक्षकांमध्ये वादावादी आणि धक्काबुक्की झाली.
त्यातून जुना रक्षक हरेकृष्ण रामप्रसाद द्विवेदी यानं आपल्या १२ बोरच्या बंदुकीतून गोळीबर केल्याने दुपारे गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात भर्ती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात पोलिसांनी द्विवेदी याला अटक केली केलीय त्यांनतर आता पोहरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
First Published: Sunday, October 14, 2012, 15:12