Last Updated: Monday, October 15, 2012, 17:41
www.24taas.com, नागपूर नागपूर शहराच्या सुरेंद्रगड परिसरात एका बिल्डरवर गोळीबार करण्यात आलाय. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेत एका बिल्डरवर भरदिवसा झालेल्य या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झालाय.
आज दुपारी, मोहन पांडे या बांधकाम व्यवसायिकावर त्याच्या राहत्या घरासमोर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पांडे यांच्या हाताला गंभीर जखम झालीय. वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाला असल्याचं जखमी बिल्डर आणि पोलिसांनी सांगितलय.
नागपूरमध्ये वसंतराव नाईक झोपडपट्टी हत्याकांड प्रकरणाला एक आठवडाही झालेला नाही, तर मानेवाडा परिसरात ठवकर ज्वेलर्सच्या मालकावर गोळीबार करत त्याचा खून झाला होता. या घटनेला आठवडा होतो न होतो तोच पांडे यांच्यावर आज गोळीबार झालाय. या घटनेने नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
First Published: Monday, October 15, 2012, 17:39