पतीसमोर गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार! Gang rape on pregnant woman in front of her husband

पतीसमोर गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार!

पतीसमोर गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

नागपूरच्या छोटा गोंदिया नामक भागात २० वर्षीय गर्भवती तरुणीवर तिच्या पतीसमक्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्याबद्दल चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आपल्या नातेवाईकांना भेटायला गेलेले पती-पत्नी रात्री आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. छोटा गोंदिया भागातील एका लायब्ररीजवळ चार तरुणांनी दोघांना अडवलं आणि पतीसमोरच गर्भवती पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर अतिशय बिकट अवस्थेत हे जोडपं पोलीस स्टेशनला पोहोचलं.

२१ वर्षीय विकी राधेलाल सूर्यवंशी, २५ वर्षीय सोनू ऊर्फ ऋषी गुलाब चंद्रिकापुरे, २३ वर्षीय अविनास रवी फांदे आणि २३ वर्षीय नितीन रमेश खडसे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 20, 2013, 19:58


comments powered by Disqus