६० वर्षीय आजोबाने केला नातीवर बलात्कार, Grandfather Rape on Granddaughter

६० वर्षीय आजोबाने केला नातीवर बलात्कार

६० वर्षीय आजोबाने केला नातीवर बलात्कार
www.24taas.com, बुलडाणा

दिल्लीत झालेल्या गँगरेप प्रकरणाने साऱ्या देश या घटनेने ढवळून निघालेला असताना अशीच एक घटना समोर आली आहे. दहा वर्षांच्या नातीवर तिच्याच ६० वर्षीय आजोबाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. नराधम आजोबाला सत्र न्यायालयाने दहा वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हरी इंगळे असे आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायदंडाधिकारी पी. व्ही. गनेडिवाला यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. पीडित मुलीच्या आईचा घटस्फोट झाल्यानंतर हरीच्या मुलासोबत तिचा विवाह झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हरी दारू पिऊन घरी आला.

त्यानंतर त्याने दहावर्षीय नातीवर बलात्कार केला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने ६० वर्षीय नराधम आजोबाला १० वर्ष तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

First Published: Tuesday, December 18, 2012, 15:46


comments powered by Disqus