Last Updated: Saturday, September 22, 2012, 14:19
www.24taas.com, नागपूरआपल्या पत्नीचा अश्लील MMS तयार करून तिला ब्लेकमेल करणाऱ्या एका अधिकाऱ्याला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. निशांत कल्लूलाथिल असं या आरोपीचं नाव आहे.
महत्वाचे म्हणजे तक्रार करणारी पत्नी आणि अटक झालेला पती - दोघेही IRS अधिकारी आहेत. फेब्रुवारी मध्ये या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पतीनं ही अश्लील चित्रफित काढल्याची तक्रार महिला अधिका-यानं केली होती. तक्रारकर्ती महिला अधिकारी नागपूरला सहआयुक्त पदावर कार्यरत असून आरोपी पती बंगलोर येथे अधिकारी आहे. हुंड्याकरता देखील आपला छळ केल्याची तक्रार या महिलेने केलीय.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पतीला अटक केलीय. आरोपी पती मानसिक रुग्ण आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.
First Published: Saturday, September 22, 2012, 14:19