Last Updated: Thursday, December 27, 2012, 14:58
www.24taas.com, भंडारामंत्रोपचाराच्या बहाण्यानं एका भोंदूबाबानं एका महिलेवर बलात्कार केला आहे. भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या किरमटी गावात ही घटना घडली आहे.
पीडित महिला मुळची चंद्रपूर जिल्ह्यातल्या बह्मपुरीची राहणारी आहे. तिला अपत्य होत नसल्यानं ती मंत्रोपचारासाठी किरमटीच्या भोंदूबाबाकडे येत होती.
भोंदूबाबानं तिच्यावर मंत्रोपचाराच्या बहाण्यानं बलात्कार केला. या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महिलेच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन तिला आपल्या जाळ्यात फसवून भोंदूबाबाने महिलेचा बलात्कार केल्याचे समजते.
First Published: Thursday, December 27, 2012, 09:50