Last Updated: Thursday, September 19, 2013, 19:14
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरविदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांना पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा उमाळा आलाय. वेगळ्या विदर्भासाठी गरज पडल्यास नक्षलवाद्यांचीही मदत घेण्यात येईल असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलंय.
रामदास आठवले यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर धोटेंची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे वक्तव्य केलं. विदर्भाच्या मुद्यावर आपण एका ठिकाणी बसून 100 बसेस फोडू शकतो, मात्र हिंसेचा मार्ग अवलंबायचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
जांबुवंतराव धोटेंच्या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. यापूर्वीही धोटे यांनी २०१० साली अशाच आशयाचं विधान केलं होतं. त्यावेळीही धोटेंवर अतिरेकी विरोधी कारवाई कायद्या अंतर्गत अटक करण्याची मागणी झाली होती. पुन्हा धोटेंनी केलेल्या विधानामुळे धोटेंचे नक्षलवादी कनेक्शन तपासणे आश्यक असल्याची मागणी होत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 19, 2013, 19:14