अपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच! Kidnapped girl`s murder

अपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच!

अपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील ८ आरोपींनी दिली आहे. पुरोगामी असल्याचा टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्रात व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याच मतदारसंघात नरपशूनि क्रौर्याची सीमा गाठली, आणि समाज मन सुन्न झाले.

कोलाम पोडाच्या सुख शांतीसाठी रक्ताचे नाते असलेल्या सपना च्या रक्ताचा घोट घेवून देवीला प्रसन्न केले अशी अंधश्रद्धा असल्याने त्या रक्तपिपासुंच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची कुठलीही लकेर दिसत नाही. गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सपना पळसकर या बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातल्या आरोपींनी दिलीय. विशेष म्हणजे मुलगी बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या आईवडलांनी पोलीसांकडे नरबळीचा संशय व्यक्त केला होता मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल होतं. त्यानंतर सामाजिक संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीसांनी या प्रकरणाचा तपास केला त्यामधून ही माहिती पुढे आलीय.

सपनाच्या शोधासाठी आंदोलन करणारे तिचे नातलगच मारेकरी असल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. सपना च्या आई ची आत्या. आजोबा, मामा व कोलाम पोडातील तिच्या आप्तेष्टांनी तिच्या गळ्यावर सुरा फिरवून तिचा बळी दिला. अशी माहिती या तपासांत पुढे आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, May 29, 2013, 20:33


comments powered by Disqus