अडवाणींची ‘भागवत’ भेट, LK Advani meets top RSS leaders

अडवाणींची ‘भागवत’ भेट

अडवाणींची ‘भागवत’ भेट

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल झालेत.

संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबागेत अडवाणी सरसंघचालक मोहन भागवत आणि सहसरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची भेट घेणार आहेत.

राजीनामा नाट्यानंतर पहिल्यांदाच अडवाणी संघमुख्याला भेट देतायत. त्यामुळे त्यांच्या भेटीकडं सर्वांच लक्ष लागलंय.
नरेंद्र मोदींकडे सोपवण्यात आलेली नवी जबाबदारी, लोकसभा निवडणुका यावर्षीच होण्याची शक्यता तसंच संघ आणि भाजपामधले वर्तमान आणि भविष्यातील संबंध या विषयावर आजच्या भेटीत अडवाणी सरसंघचालकांशी चर्चा करतील अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, July 5, 2013, 18:12


comments powered by Disqus