विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी low tempereture in Vidarbha

विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी

विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी
अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर

गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.

उत्तर भारतातल्या थंडीच्या लाटेमुळं विदर्भातल्या सर्वच 11 जिल्ह्यांना हुडहुडी भरलीये. सर्वच जिल्ह्यांत पारा आठ ते 10 अंशावर आलाय. नागपुरात तर सलग दोन ते तीन दिवस 6.3 अंश सेल्सियस निचांकी तापमानाची नोंद झाली. येत्या दोन ते तीन दिवस हीच स्थिती कायम राहणार असा अंदाज व्यक्त केला जातोय.

आठ ते दहा अंश सेल्सियस तापमान गहू, हरबरा आणि तुरीच्या पिकांसाठी उत्तम आहे. मात्र पारा सातत्यानं त्यापेक्षा खाली राहिला तर पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता कृषितज्ञ्जांनी व्यक्त केली आहे. खरीप पिकांना पावसानं दगा दिला. हिवाळ्यात पिकांना अनुकूल वातावरण असल्यानं बळीराजा कडाक्याच्या थंडीतही सुखावलाय.

First Published: Sunday, December 30, 2012, 21:18


comments powered by Disqus