Last Updated: Monday, December 10, 2012, 16:10
www.24taas.com, नागपूरदेशभरात स्फोट घडवून तीन हजार लोकांना उडवून देऊ, आम्ही रांचीमध्ये पोहोचलो आहोत, असा धमकीचा ई-मेल आल्यानंतर झारखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणेला ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला.
मुंबईतील राज्य पोलीस मुख्यालय तसेच अमरावतीच्या शहर पोलीस आयुक्तालयासह तिन्ही राज्यांमध्ये हा धमकीचा ई-मेल मिळाला आहे.
दानिश आलम या तथाकथित अतिरेक्याने danishalam902@ymail.com या मेल आयडीवरून ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हा मेल पाठविला आहे. हा मेल नेमका कोणी केला याची माहिती चार दिवसांपासून गुप्तचर यंत्रणा घेत आहे. धमकी ई-मेलनंतर सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांना तत्काळ सतर्क करण्यात आले. नागपुरात सुरू होणार्याे विधिमंडळाचे अधिवेशनसाठी यंत्रणांनाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
- ‘हमारे भाई लोग मारे जा रहे है, अब इंतकाम लेने का समय आ गया है. इस बार हम बोलके हमला करनेवाले है, सभी को बता दो.’ ‘हम बदला लेंगे, हिंदुस्तानवाले तयार रहे, बस कुछ ही दिनोंमे हम तीन हजार लोगों को खत्म करेंगे, असेही मेलमध्ये बजावण्यात आले आहे.
First Published: Monday, December 10, 2012, 16:10