मनसेचा नागपूरमध्ये राडा, Mns : Municipal Office Target in Nagpur

मनसेचा नागपूरमध्ये राडा

मनसेचा नागपूरमध्ये राडा
www.24taas.com , झी मीडिया, नागपूर

नागरी सुविधा देण्यास नागपूर पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने नागरिकांचा पारा चढला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यालयाला टार्गेट केले. कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये मनसेचे झेंडे होते.

नागरी सुविधा पालिकेकडून मिळत नसल्याने पालिकेच्या लकडगंज येथील कार्यालयासमोर मनसेकडून आज आंदोलन केले. मात्र, काही कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयावर चाल केली. कार्यालयात घसून जे हातात मिळेल त्याची तोडफोड केली. यावेळी खुर्च्या उचलून खाली आपटल्या. तर टेबलावरील साहित्य फेकून दिले. याचवेळी तोडफोड केली. तोडफोडीनंतर कार्यकर्ते पळून गेलेत.

कार्यकर्त्यांनी हातात मनसेचे झेंडे घेतले होते. पालिका प्रशासनाला यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारण्यात आला. काही समजण्याआधीच काही कार्यकर्ते पालिका कार्यालयात घुसल्याने यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 13:40


comments powered by Disqus