Last Updated: Tuesday, June 11, 2013, 14:15
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर नागपूर महानगर पालिकेद्वारा संचालित ‘ऑरेंज सिटी वॉटर कंपनी’नं स्थानिकांना डावलून परप्रांतियांना कामाचं कंत्राट दिल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयात तोडफोड केली.
गेल्या १० वर्षांपासून महानगर पालिकेकरता काम करणाऱ्या कंत्राटदारांना डावलून हे झाल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंबंधी पालिका आणि कंपनी प्रशासनाला अनेकदा तक्रारी करूनही काहीही कारवाई झाली नाही म्हणून ही तोडफोड करावी लागली, असं स्पष्टीकरण मनसे कार्यकर्त्यांनी दिलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 11, 2013, 14:11