स्वतंत्र विदर्भासाठी `जंतर मंतर`वर आंदोलन! Movement at Jantar Mantar for Separate Vidarbha

स्वतंत्र विदर्भासाठी `जंतर मंतर`वर आंदोलन!

स्वतंत्र विदर्भासाठी `जंतर मंतर`वर आंदोलन!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते आता आक्रमक झाले आहेत. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला जंतरमंतर मैदानावर प्रातिनिधिक आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारला 28 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यानंतर नागपूर कराराची होळी करण्यात येईल असा इशारा विदर्भ कृती दल समितीचे समन्वयक वामनराव चटप यांनी दिलाय. महाराष्ट्रामधील सत्ता जाईल या भीतीनं काँग्रेस या प्रकरणी चालढकल करत असल्याचा आरोपही चटप यांनी केला.

काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांच्यावरही त्यांनी टिका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र विदर्भासह महाराष्ट्र एकसंघच राहील अशी हमी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 3, 2013, 17:54


comments powered by Disqus