Last Updated: Monday, April 22, 2013, 18:39
www.24taas.com, नागपूरएका नराधमाच्या अमानूष अत्याचाराला बळी पडलेल्या मध्य प्रदेशच्या ४ वर्षाच्या चिमुरडीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याने लहानगीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय..
तिच्या प्रकृतीत अजून काहीही सुधारणा झाली नसून तिला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय... या चिमुरडीचं ब्लडप्रेशरही कमी झालं असून सध्या ती नागपूरच्या केअर हॉस्पीटलमध्ये व्हेंटीलेटरवर आहे...
या चिमुरडीला लाईफ सेव्हींग ड्रग्ज देण्यात येत असल्याचं डॉक्टरांनी मेडीकल बुलेटीनदरम्यान सांगितलं.. सिवनी जिल्ह्यातील घनसौर गावातील रहिवासी असलेल्या या चिमुरडीला शनिवारी नागपूरच्या या खाजगी रुग्णालयात भरती केले होते.
दरम्यान या पिडीत मुलीच्या देखरेखीकरता मध्य प्रदेश सरकारने आपले वरिष्ठ अधिकारी नागपूरला पाठवलेत. तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च मध्य प्रदेश सरकार उचलणार असल्याचे सिवनीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले....
First Published: Monday, April 22, 2013, 18:35