Last Updated: Tuesday, June 4, 2013, 20:21
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरनागपुरात एका विवाहित महिलेच्या खुनाप्रकरणी नवीन खुलासा झालाय. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणं ही पूर्ण घटना घडली असून खून करणा-या आरोपीनं खून केल्यानंतर महिलेचा अपघात झाल्याचा देखावा केला. पण पोलिसांसमोर आरोपीचा देखावा चालला नाही.
नागपूरच्या वाडी परिसरातल्या सराफा दुकानाचा मालक गजानन तीनखेडे हा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. नागपूरच्या महाल परिसरात राहणा-या गजाननचं त्याच्याच दुकानात काम करणा-या महिलेसोबत संबंध होते. मात्र या महिलेचं गजानननं आपल्याच दुकानात काम करणा-या आनंद सोनी नावाच्या कारागिरासह या महिलेचं लग्न लावून दिलं. मात्र लग्नानंतरही त्यांचे संबंध सुरूच होते. या महिलेनं गजाननला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळं त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळंच गजानननं या महिलेचा काटा काढायचा निर्णय घेतला. आणि रामटेकला घेऊन जात प्रेयसीचा खून केला. खूनानंतर अपघात झाल्याचा गजानननं बनाव केला मात्र पोलिसांसमोर गजाननचा देखावा खूप वेळ चालला नाही.पोलिसांनी सत्य शोधून काढलंच.
दरम्यान, आपल्या बहिणीवर अत्याचार करून खून केल्याचा आरोप मृत महिलेच्या भावानं केलाय. नागपूरच्या ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गजाननसह आता तिघांना अटक केलीय. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांकडून होतेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 4, 2013, 20:21