नागपूर भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षांचे निधन, Nagpur ,BJP, Hemant Divewar

नागपूर भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षांचे निधन

www.24taas.com,नागपूर

रविवारी रात्री गोळीबार झालेले नागपूरचे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक हेमंत दिवेवार यांचं निधन झालंय. काल रात्री 9च्या सुमारास शंकर नगर चौकात हा गोळीबार झाला होता.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अर्ध मंत्रिमंडळ नागपुरात असतानाच ही घटना घडलीये. यामुळे पोलिस दलात खळबळ माजलीये. दियेवार हे प्रापॅर्टी डीलर असल्यानं भूखंडाच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आठ महिन्यांपूर्वी प्रतापनगरमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवरील हल्लाप्रकरणात त्यांचं नाव चर्चेत होतं. या घटनेमुळे नागपूरात तणावाचं वातावरण आहे.

First Published: Monday, February 25, 2013, 10:59


comments powered by Disqus