Last Updated: Saturday, April 26, 2014, 21:26
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरअश्लिल एमएमएस तयार करत एका डॉक्टरने आयुष्याची राखरांगोळी केल्याने निराश झालेल्या युवतीने स्वतःला जाळून घेतलं. ही दुर्दैवी घटना नागपुरात घडलीय. गंभीर स्वरूपात जळालेल्या युवतीचा नागपूरच्या शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी डॉक्टरला अटक केलीय.
डॉक्टरकडे प्रकृती बरी नाही म्हणून नागपूरची युवती घराजवळच्या कुंतल जांभूळकर नावाच्या डॉक्टरकडे गेली. त्यातून झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं.. त्यातून गाठीभेटी वाढल्या.. कुंतल जांभूळकरने लग्नाचं आश्वासन दिल्यावर शरिरसंबंध निर्माण झाले. मात्र या नराधम डॉक्टरने याचा गैरफायदा घेत तिची अश्लिल एमएमएस क्लिप तयार केली. युवतीला जबरदस्ती गर्भपात करण्यासही भाग पाडले, अशी तक्रार तरुणीच्या भावानं नोंदवलीय.
मुलगी राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करत होती. लग्नासाठी मागे लागलीस तर एमएमएस जगजाहीर करण्याची धमकी त्याने दिली. त्याच्या या प्रतारणेमुळे नाराज झालेल्या युवतीने अखेरीस स्वतःला जाळून घेतलं. मृत्यूपूर्व जबानीत तिने या बाबींचा उल्लेख केलाय. त्यानुसार कुंतल जांभूळकरला अटक करण्यात आलीय, अशी माहिती पोलीस निरीक्षक पी. एन. भाटकर यांनी दिलीय.
कुंतल जांभूळकरने इतरही काही महिलांना अशा पद्धतीने फसवलं आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. पण आपल्या या कृत्याने त्याने डॉक्टरी पेशाला काळीमा फासला हे नक्की
व्हिडिओ पाहा -
First Published: Saturday, April 26, 2014, 21:25