नागपूरमध्ये गोळीबार, एक गंभीर, Nagpur in fire, one injured

नागपूरमध्ये गोळीबार, एक गंभीर

नागपूरमध्ये गोळीबार, एक गंभीर
www.24taas.com,झी मीडिया, नागपूर

नागपूरमधल्या फ्रेंड्स कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या घटनेत उमेश पांडे नावाच्या तरुणावर त्याचाच मित्र कृणाल शर्मानं देशी कट्यानं एक राउंड गोळी फायर केली. त्यात उमेशच्या खांद्याला गोळी लागल्यानं उमेश गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश आणि प्रदीपचा जुना वाद होता. आणि त्यातूनच ही घटना घडल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 10:37


comments powered by Disqus