तुमचा गुरखाच करतोय `चोरी`, वाढली त्यांची `मुजोरी`, Nagpur Thief

तुमचा गुरखाच करतोय `चोरी`, वाढली त्यांची `मुजोरी`

तुमचा गुरखाच करतोय `चोरी`, वाढली त्यांची `मुजोरी`
www.24taas.com, नागपूर

ज्यांच्या भरोशावर पूर्ण घराच्या आणि परिसराच्या सुरक्षेची जवाबदारी सोपवून आपण निर्धास्त असतो अशा गुरखांनीच घरफोडी करण्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. रात्रभर गस्त घालणाऱ्या गुरख्यांमुळे आपलं घर सुरक्षित असतं असा आपला विश्वास. मात्र नागपुरात तो पुरता खोटा ठरलाय.

कारण नागपुरातल्या कुही गावात गुरखाच चोरी करत असल्याचं उघड झालंय. गेल्या दोन वर्षापासून गुरखांच्या या टोळीचा हा गोरखधंदा सुरु होता. मात्र अनोख्या मोडस ओपेरंडी मुळे ते आजवर पकडले गेले नाही. घरफोडी केल्यावर घरमालकाला आपणच माहिती द्यायची आणि आपल्यामुळेच चोरांना अधिक चोरी करता आली नसल्याचा दावा करायचा...

अशी या गुरख्यांची मोडस ऑपरेंडी होती. सोनाराकडे चोरलेले दागिने विकण्यास गेले असताना शंका आल्यानं हा प्रकार उघडकीस आला. गुरख्यांकडूनच अशा प्रकारे चोरी होत असल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

First Published: Friday, September 21, 2012, 20:06


comments powered by Disqus