Last Updated: Sunday, January 20, 2013, 08:39
www.24taas.com, गडचिरोलीगडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालीय.. यांत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय. अहेरीतल्या जिलमगट्टा इथं ही घटना घडली. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
या आधी गडचिरोलीच्या अहेरी पोलिसांनी तीन बोगस नक्षलवाद्यांना अटक केलीय. आपण नक्षलवादी असल्याचं सांगून एका राजकीय पुढाऱ्यांकडे खंडणी मागणाऱ्या या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. गडचिरोलीतील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते बाबू हकीम यांच्याकडे तिघांनी पाच लाखांची खंडणी मागितली होती. हकीम यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.
अहेरी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल कॉल ट्रेस करीत आसरअल्ली इथ सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुलही जप्त करण्यात आलंय. पकडलेले तिघेही जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अशी माहिती अहेरीचे पोलीस अधिक्षक राहुल श्रीरामे यांनी दिली.
गडचिरोलीत नक्षली असल्याचं सांगून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढलेत. पोलिसांनी असे डझनभर तोतया नक्षलवाद्यांना गजाआड केलंय. यावरुन खंडणीखोरीचा हा व्यवसाय किती बहरला आहे, याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. खऱ्या नक्षलवाद्यांच्या कारवायांना तोंड देण्याबरोबरच या तोतया नक्षलवाद्यांचे उच्छाद रोखण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
First Published: Sunday, January 20, 2013, 08:34