Last Updated: Wednesday, December 19, 2012, 13:40
www.24taas.com, नागपूर`नेहमी गुजरातची प्रगती पाहणाऱ्या राज ठाकरेंनी जरा महाराष्ट्राच्या प्रगतीकडे पाहावं` असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. नेहमी गुजरातची स्तुती करतात, राज यांना मी महाराष्ट्राने काय प्रगती केली त्याची माहिती पाठवणार आहे. गुजरातमध्ये फक्त नरेंद्र मोदीच आहेत. आणि तेही फक्त काही करण्यापेक्षा जास्त जाहीरातबाजीच करतात.
त्यामुळेच विकास झाला आहे असं दिसून येतं. मोठ-मोठे उद्योग ते गुजरातमध्ये आणत आहेत, परंतु गरिबांसाठी त्यांच्याकडे योजना नाही. महाराष्ट्र जीडीपी, दरडोई उत्पन्न अशा सर्वच बाबतीत आघाडीवर आहे, असा दावाही राणे यांनी केला. महाराष्ट्राची आणि गुजरातची तुलना केल्यास गुजरात पिछाडीवर असल्याचे दिसून येईल.
राज ठाकरे यांनी राज्याची आकडेवारी पाहिली तर त्यांना महाराष्ट्राची प्रगती कळेल अशी माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे राज ठाकरे आता नारायण राणेंना काय उत्तर देणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
First Published: Wednesday, December 19, 2012, 13:25