Last Updated: Wednesday, December 19, 2012, 12:50
www.24taas.com, नागपूरउद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. शिवसेनेमध्ये कोणीही बोलणारं राहिलेलं नाही. असं म्हणत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाविषयीचाच प्रश्न निर्माण केला. त्यामुळे आता नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा सामना रंगणार का याकडेच साऱ्याचेच लक्ष लागून राहिले आहे.
`सभागृहात शिवसेनेचे आमदार बोलत नाहीत . त्यांच्या नेतृत्वातच धमक नसल्याने,` आमदार तरी काय बोलणार म्हणा... असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर न बोलता निशाणा साधला आहे. `आता या पक्षाचे भवितव्य सांगता येणार नाही . मी वेळ आणि काळ पाहून अलीकडे राजकारण करत आहे`. त्यामुळे श्वेतपत्रिका म्हणजे आरोपपत्र नव्हे. अजूनही त्याचे सादरीकरण झालेले नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भातील मी सबंधित समितीचा अध्यक्ष म्हणून अहवाल दिलेला आहे . याबाबत मी सकारात्मक माझे मत दिले आहे . मात्र हा कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. तर औरंगाबादमधील उद्योजक चांगले काम करीत असून दिवसेंदिवस त्यांचा टर्नओवर वाढत आहे. औरंगाबाद ऑटो इंडस्ट्रीमध्ये अग्रेसर होत आहे.
First Published: Wednesday, December 19, 2012, 12:37