Last Updated: Sunday, August 18, 2013, 17:41
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरवेगळा विदर्भ दिल्यास त्यावर नक्षलवाद्यांचा प्रभाव राहील ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांपेक्षा मंत्रालयात बसलेले नक्षलवादी अधिक धोकादायक असल्याची टीका कडू यांनी केली. असहाय्य सर्वसामान्य माणसाचं खच्चीकरण या सरकारमुळे झालंय अशी टीका त्यांनी केली
शिवसेना सोडली तर राज्यातल्या सर्वच पक्षांनी वेगळ्या विदर्भाचा सूर आळवलाय. वेगळ्या विदर्भाची मागणी तशी तेलंगणापेक्षा जुनी आहे. मात्र विदर्भातल्या नेत्यांची स्वतंत्र राज्यासाठी कधीच आक्रमक भूमिका घेतली नव्हती.
मुंबई आणि विदर्भ हे महाराष्ट्राचे अविभाज्य भाग असून ते वेगळे करता येणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. तसंच विदर्भ वेगळा झाल्यास नक्षलवादाची भीतीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 18, 2013, 17:41