Last Updated: Wednesday, January 1, 2014, 16:42
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरनववर्षाच्या स्वागाताचा सर्वत्र जल्लोष सुरु असतानाच नागपुरात मात्र या सेलिब्रेशनला गालबोट लागले. नवा वर्षाच्या जल्लोषा दरम्यान मध्यरात्री झालेल्या दोन रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
नागपुरातील जीपीओ चौकात एका भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट गाडीनं दुचाकीला दिलेल्या धडकेत ४५ वर्षाच्या दशरथ जंगले आणि ६० वर्षाच्या मुरलीधर राधवानी या दोघांचा मृत्यू झाला. तसंच शहराच्या एलएडी चौकात झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या एका युवकाचा तोल जाऊन त्याचाही मृत्यू झाला.
नव्या वर्षाच्या निमित्ताने दारू पिऊन वाहन चालवण्याचं एकूण ३४५ प्रकार घडले. या सर्व प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण शहरात पोलिसांनी एकूण सुमारे ८०० वाहन चालकांची ड्रिंक-एंड-ड्राइव्ह मोहिमे अंतर्गत तपासणी केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 1, 2014, 16:36