स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध- गडकरी nitin gadkari on vidharbha

स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध- गडकरी

स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध- गडकरी

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं, भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री, नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव वादंग निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध आहे, आमच्या भूमिकेवर कुणी संशय घेऊ नये, वेगळ्या विदर्भासाठी इतरांनी मदत करावी असं आवाहन यावेळी नितिन गडकरी यांनी केलं आहे.

भाजपचा हा मुद्दा मित्र पक्ष शिवसेना पटेल का प्रश्न उपस्थित होतोय. आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर, भाजपला महाराष्ट्राची जनता कौल देते की नाकारते, हे निवडणुकीनंतर समजणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 8, 2014, 18:25


comments powered by Disqus