Patiala peg bar runs illegaly-24taas.com

कायदा हद्दपार, सुरू `पटियाला पेग बार`

कायदा हद्दपार, सुरू `पटियाला पेग बार`
www.24taas.com, नागपूर

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नागपुरातल्या म्हाडा कॉलनीत असलेला पटियाला पेग बार राजरोसपणे सुरुच आहे. हा बार बंद करण्याबाबत महिलांनी मोठं आंदोलन केलं होतं. शिवाय बार बंद करण्याचा मुद्दा उच्च न्यायालयातही गेला होता.

हा बार अवैधपणे सुरु असल्याचं निरीक्षण नोंदवत तो बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र असं असतानाही बार राजरोसपणे सुरु असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

न्यायालयाच्या आदेशानंतरही बार कसा सुरु असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. तर दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नसल्याचा दावा बार मालकाने केलाय..

First Published: Saturday, August 18, 2012, 08:38


comments powered by Disqus