जुगाराच्या अड्ड्यावर धाड, पोलिसावरच बदलीची कुऱ्हाड! POLICE TRANSFER

जुगाराच्या अड्ड्यावर धाड, पोलिसावरच बदलीची कुऱ्हाड!

जुगाराच्या अड्ड्यावर धाड, पोलिसावरच बदलीची कुऱ्हाड!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

राजकारणी लोकांविरुद्ध कोणी आवाज उठवला तर एकतर त्याला पैशाने विकत घेतलं जातं, नाहीतर त्यांना दामटवून गप्प केलं जातं. आणि जर एखाद्या पोलिसाने असं काही केलं तर त्या पोलीसाची बदली ही निश्चितच.

अशीच एक घटना नागपुरात घडलीय. जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे टाकल्यामुळे पंकज भालेराव या पोलीस निरीक्षकांची बदली केल्याचा आरोप करण्यात येतोय. नागपूरच्या धावडे मोहल्ल्यावर लकडगंज पोलीसांनी धाड टाकली होती. या धाडीच्या दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते जुगार खेळल्याचे आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्यानं पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा आरोप होत आहे

याच कारणामुळे पोलीस उपनिरीक्षक पंकज भालेराव यांची बदली केल्याचा आरोप करण्यात येतोय. दरम्यान भालेराव यांची बदली नियमाला धरुनच करण्यात आली असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 17, 2013, 17:05


comments powered by Disqus